परीचय ....
.
वेगळी अशी ती ओळख काय करून द्यायची?
खरच, एक यक्ष प्रश्न माझ्या समोर !!!
गुदमरलेल्या स्वप्नानच्या शर्यतेत, भावना शून्य प्रेमाच्या विश्वात,
जीथे फक्त शब्द तलवार होऊ पाहता आहे ......
अशा अव्यवाहारीक जगात, शब्दांचा आधार घेउन.
एक सामान्य माणूस म्हणून जगण्याचे दीवा स्वप्न पाहणारा ..... मी.
कुठे तरी व्यवहारीक मायाजालातून बाहेर पडण्याचा माझा प्रयत्न.
मला तर तुम्ही परीचीत आहात, माझा परीचय तुम्ही स्वतला करुन द्या.
पहा एक नवीन ऋणानुबंध निर्माण होता आहेत की नाही?
ऋणानुबंध आपले तसे फार जुने,
आठवणीना ही आपण ह्या शर्यतीत मागे सोडलेल....
परीचय म्हणटल की मी असा, मी तसा, मी अंमुक, मी तमुक .......
माझा परीचय ...... अबोल शब्द ..... प्रीतीचे हे बंध रेशमी आज !!!
शब्दांशी असलेल माझा नात आणी त्या नात्यांचा आधार घेऊन,
माझा कवितांनी निर्माण केलेला स्नेह, बहुतेक हीच ओळख पुरेशी.
थोडस आडवाटेने, तुमच्या जीवनात पाउलखुणा सोडून जाणारा,
तुमच्याच जीवनातला ......... मी एक सुजय !!!
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा