दोन शब्द
.
पद्यात लिहायला केव्हा लागलो, उमजलंच नाही. प्राथमिक शाळेत असताना ग. वी. जोशी सरांचे मराठी रसग्रहणाचे संस्कार बरंच काही घडवून गेले. नकळत वर्गपाठाच्या वह्या कवितांच्या रेघोट्यानी भरू लागल्या, आपण काव्यात लिहितो आहे हे कळायला मित्रांची पाठीवरची एक थाप खूप काही देऊन गेली. कुमार वयात कवितांचे उमारे फुटतात हे काही खोटं नव्हे. पहिला काव्यप्रवास ह्याच संवेदनातुएन प्रभावीत झालेला. पुढे सामाजिक प्रश्नांनी मनात घेर घातलेला, त्या घुसमटलेल्या भावनाना मुक्त करण्याचा प्रयत्न, आयुष्यात झालेले बदल व त्या जाणीवान मधुन निर्माण झालेला राग, लोभ, प्रेम, तिटकारा कवितेतुन मांडत गेलो, मित्रांनी उपाधी दिली ... "तू कविता करतोस" !!
लिखाणाचा प्रवास महाविद्यालयात असताना चांगलाच बहरला, मागल्या बाकावर बसुएन मी कविता लिहल्या आणि मित्रांनी त्या डोक्यावर घेतल्या. अभियांत्रिकीच्या वर्गात म - ३, म - ४ च्या जागेवर मराठी कवितांच्या बेरजा आणि वजाबाक्या बरसायला लागल्या. त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमात मराठी केव्हा मागे पडले आणि मी केव्हा अमराठी झालो मला कळलेच नाही. गेली पाच वर्ष मी मराठी कविता लिहल्या नाहीत, मनाला कुठे तरी टोचणी लागलेली.
लीहलेल्या कविता प्रकाशित करण्याचा मानस केव्हाच नव्हता आणि आता हि तो नाही. हि धडपड, हा प्रयत्न माझं मराठीपण जाग ठेवण्याचा. आपल प्रेम आणि स्नेह असच वृदिगंत होवो हिच परमेश्वरा जवळ प्रार्थना !!!
आपला सुजय ...
***मी लिहिलेल्या ५०० वर कविता येथे प्रकाशित करण्याचा मानस आहे, सध्या प्रत्येक आठवड्याला एक कविता प्रकाशित करणार आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा