मी कविता करतो
.
लोक म्हणतात तो कविता करतो. मन म्हणत तू कविता करतो.
हो मी म्हणतो मी कविता करतो ......
ती समोर येताच शब्द ओठांवर गोठतात.
प्रेम व्यक्त न करताच, कित्येक प्रेमी असेच मरतात.
मी बोलायाला लागलो की शब्द यमक जुळऊनच बाहेर पडतात.
मन समोर उघड करुन ठेवलं तरी ती म्हणते, तुला कविता फार छान करता येतात.
लोक म्हणतात तो कविता करतो.
मन म्हणत तू कविता करतो.
हो मी म्हणतो मी कविता करतो ......
मनाची व्यथा शब्दान समोर मांडली.
त्यांनी काव्याला माझी साथ द्यायला सांगितली.
आता प्रश्न असा आहे ...
तिच्या साठी कविता सोडावी म्हणटल तर ती माझ्यासाठी जग सोडेल.
जर एवढं करुएन देखील,
ती माझ्या प्रेमाला एक कविताच समजेल.
तर ज्या शब्दांनी मला इथवर पोहोचवलं
त्यांना मी कसा विसरेन ....
लोक म्हणतात तो कविता करतो.
मन म्हणत तू कविता करतो.
ती देखील म्हणते, तू फार छान कविता करतोस ......
नाही हो, नाही हो
मी शब्दानवर प्रेम करतो, मी शब्दानवर प्रेम करतो ...
मी कविता करतो
दिनांक: २५ फेब्रुवारी २००३, ८:३० रा.
दिनांक: २५ फेब्रुवारी २००३, ८:३० रा.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा