का कुणास ठाऊक
का कुणास ठाऊक ...
एका तपा नंतर पुन्हा काही तरी लिहावसं वाटलं,
निर्ढावलेल मन, साजूक तुपा सारखं थिजलेल.
जीर्ण झालेल्या घोधडीला जशी ठिगळांची आस,
काही दिवसान पासून होत होते शब्दानं चे भास ...
का कुणास ठाऊक ...
भावनांन अभावी खुंटलेले निरागसता माझी,
खाटकाच्या खुंटीला टांगलेल्या बोकडा सारखी झाली.
दिवस आले, गेले दिवस वहीवर हिशोब मांडताना,
कितेक वर्ष लोटली, फक्त आकडे मोड करताना ...
का कुणास ठाऊक ...
फुले ती पारीजातका सारखी क्षणात कोमजली,
भुंग्याची परी भाषा न मज कधी उमजली.
जसा दंव बिंदू मी, गवताच्या काडा वरचा,
ओघळ्ण्यासाठी वाऱ्याच्या झुळकेची वाट पहिली ...
का कुणास ठाऊक ...
थारोळ्यात पडत राहणाऱ्या मोटएच्या पाण्या सारखं
मनाला पण खळखरुन वाहवास वाटलं ...
क्षब्दानी केलेला भावनांचा पाठलाग,
एका तपा नंतर कवितेचा झोपडं थाटलं.
का कुणास ठाऊक ...
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा