P L Nights | Comedy Poems on Engineering College Life | Engineering Days comedy Marathi Poem
दिवस असायचे अभ्यासाचे
रात्रीच्या जागण्याचे
जागे ठेवायला स्वताला
गरम गरम चहाचे पेले
तर कधी सिगारेटचे धुपारे
अभ्यासा व्यतिरिक्त विषय देखील निघायचं
कुठल्या न कुठल्या पोरीसाठी
प्रत्येक जण प्रत्येक रात्री झुरायचा
रात्रीच्या भुकेची बातच और
कधी उरलेला डबा, तर कधी
बिस्कीटचे पुडे खाऊन काढायचे जोर
अभ्यास बाजूला ठेऊन गप्पा रंगायच्या
पहाटे चिमण्या चीवचीवल्यावर
आमच्या बैठकी हलायच्या
तेंव्हा अभ्यास जागच्या जागी असायचा
रोज दुपारी झोपून उठल्यावर
प्रत्येक जण अभ्यासाच्या रात्रीची वाट बघायचा ....
अभ्यास रात्र (P L Nights)
दिनांक : ९ एप्रिल २००१, वेळ: ९:१५ रात्र
#comedykavita #engineeringlifekavita #collegemarathipoem #marathikavita #marathipoem #marathikavitavideo #comedymarathipoem #bestmarathikavita #topmarathikavita #popularmarathikavita #marathiblogskavita #marathishortpoems
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा