मामा
जेंव्हा मी स्वताला विसरल
तेंव्हा तुला आठवणीत ठेवलं
पैसा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न
समोर आल्यावर तू दुसरयालाच निवडल
जेंव्हा वादळात अडकली होतीस एकटी
खंबीर हाताचा आधार दिला
अनाहूत समोर आल्यावर
तुझ्या मुलाचा मामा बनवला
मी देखील नवा खेळ मांडायचं ठरवलं
प्रत्येक वेळी सिंहासन बदलायचं ठरवलं
आरशा समोर उभा राहिलो त्यान बघायचं नाकारलं
त्यानंतर प्रत्येकाचा मामा बनायचं ठरवलं ....
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा