एका पाऊसात ...
.
एका पाऊसात,
साचलेल्या पाण्यावर कागदाच्या होडी तरंगलेल्या,
जशा मनातल्या भावना ओठांवर अडलेल्या.
एका पाऊसात,
मी भिजत होतो, मन मात्र कोरडच होत.
पाऊस कोसळत होता, मनात आठवणी तुडूंब साचत होत्या.
एका पाऊसात,
छत्रीचा आडोसा घेत, ती धावत आली माझ्या कडे,
मला भिजायाच होत, ती निराश झाली.
एका पाऊसात,
माझे धडपड चालू होती प्रत्येक थेंब अनुभवायचा,
त्यांचा प्रयत्न सागराला शरण जाण्याचा.
एका पाऊसात,
मला अनुभवायच होत प्रेम, थोडं थांबुन पाहायचं,
किती मावता आहेत, तळ हातावर पाऊसाचे थेंब.
एका पाऊसात ....
एका पाऊसात ...
दिनांक : ६ सपतेम्बर २००३ , वेळ: १:४५ दु. .
दिनांक : ६ सपतेम्बर २००३ , वेळ: १:४५ दु. .
1 टिप्पणी(ण्या):
अमूल्य ashya marathi prem kavita aahet...
टिप्पणी पोस्ट करा