एक वेडा - एका मनोरुग्णाची उपेक्षित दुनिया
.
तो मधेच डोक्याला खाज्वायाचा.
एक टक माझ्या कडे पाहायचा.
वीज चमकल्या प्रमाणे उठायाचा.
तव्यावर पडलेल्या लोण्या प्रमाणे विरघळायाचा.
त्याची दुनियाच वेगळी, लोकांनी त्याला नाव दिल एक वेडा.
त्या साठी माणसाच्या माणुसकीला का सोडा?
तुम्ही त्याला दगडी मारली, त्याने फुला प्रमाणे वेचली.
तुम्हे त्याला शिव्या दिल्या, त्याने पदव्या म्हणून ग्रहण केल्या.
तो असाच कधी निशब्ध, तर कधी काळीज तोडत ओरडणारा.
स्वताच्या अस्तित्वा साठी झगडणारा.
माणसात असुन माणसांन पासुन वेगळा.
आम्ही तुम्ही, त्याला नाव दिलं ...... एक वेडा
एक वेडा - एका मनोरुग्णाची उपेक्षित दुनिया
दिनांक : १९ ऑक्टोबर २००३, वेळ: ९:३० रात्र
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा