भाकरी | सामाजिक आशयाची मराठी कविता | ग्रामीण भाषेतील कविता | Marathi Poem on Hunger | Farmer Poem

.

रख्मी वैदिनीच्या डोक्यावर वझ्याची पाटी.
डाव्या हातात शेंबडा दिलप्या,
उजव्या काखत टोपद्यातला तान्हा बाल्या.
पोटात झोपलेला अवखळ किरीष्णा.
गोणपाटाची वळकुटी घेउएन, मोहरा चाललेले लक्षी आणि कुत्रा बागल्या.

"माय बिब घ्या बिब, फण्या घ्या फण्या,
गोधडीचा दोरा, शिकाकाई, सुया तरी घ्या.
माय शिळी पाकी भाकरी द्या,    भाकरी ...."

सगळी वाडी पालथी घालऊन झाली.
त्या  संग्ल्यांची लवाजमा बाबली खाली निवावली.
आजच्याला चारच भाकरी मिळाल्या,
चोखांड चोखांड त्यांनी तोडावर धुतल्या.
पुढल्या वाडीत निघताना काळवनडया लागलं,
नकळत पाई पालाकडा वळाया लागलं.

झोपडीच्या बाहेर महाध्या बाटली पालथी करुएन बसलेला.
आल्या आल्या रख्मीच्या आई बापाचा उद्धार करुएन,
त्यांना तिला भाकरी कराया लावलेल.
चुल्खंड पेटवला चारच भाकरी भजल्या, महाध्या भाद्खावाचा त्वांड वदल.
रख्मीला रातच्याला उपाशीच निजवा लागल.

पुन्हा सकाळच्याला तीच आरव.
वाडीला निघताना रोजचा तोच लवाजमा ,
भाकरी मागायाच त्राण तिच्यात नव्हता उरलेल.
सुया, बिब, फण्या बरोबर भाकरी कोण मागणार..
शेवटी भुकेल्या पोटातल्या क्रीश्न्यान त्वांड उघडलं.

माय शिळी पाकी भाकरी देता का,   भाकरी ...."

भाकरी 
दिनांक : १४ जुलै २००३, वेळ: १२:३० रात्र


 भाकरी  - ग्रामीण भाषेतील कविता 





#marathikavita #marathipoem #marathikavitavideo #bestmarathikavita #topmarathikavita  #popularmarathikavita #marathiblogskavita #marathishortpoems #marathikavitavideo
#marathipoemvideo

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या अमूल्य वेळा बदल आभारी आहे.
आपला आभीप्राय लवकरच प्रकाशित केला जाईल.

धन्यवाद !!
सुजय खांडगे

TourdeFarm - India's First Agritourism & Farmstay Portal


TourdeFarm - India's First Agritourism & Farmstay Portal


  © माझ्या मराठी कविता © 2010-2016 by Sujay Khandge - Digital Marketing Expert Pune Best Marathi Kavita Blog

Back to TOP