मी प्रेमाला विचारल
.
मी तिला विचारल्यावर नाही म्हणाली,
जेव्हा एकटक पहात होती तिरप्या नजरेने.
गालातल्या गालात हसुएन, आडखळत होती,
नकळत गुंतत होती माझ्या मध्ये ........
मी प्रेमाला विचारल माझ्यासाठी काय काय करशील?
खांद्यावरच वजनधार गुलाबी गाठोडं सोडून,
त्यातल सर्व सामान त्यांन माझ्या समोर मांडलं.
मनातली भीती, काळजातली हूरहूर,
डोळ्यातल्या सावल्या तीच्या ....
दिवसा झोपेतल्या आणि रात्रीच्या जागण्यातल्या,
छबी त्या लुकलुकनाऱ्या ताऱ्याच्या आणि तिच्या ....
एकटापण घालवण्या साठी,
सोबतीला आठवण तिची.
सोबत तर सुटणार नाहीना,
उगाचचं भीती मनाला तिच्या आठवणींची.
सर्व काही माझ्या पुढ्यात ठेऊन,
प्रेम हसत हसत पुढे निघाल.
मी विनवला, जरा थांबशील,
तर हाल माझे सांगू शकेन तुला.
ते म्हणाल, अरे त्याच त्याच गोष्टी नेहेमीच्या,
वेळे वर जर पोहचलो नाही ना, ह्याही पेक्षा वाईट तिची स्तिती असेन.
प्रत्येक ठिकाणी, प्रत्येका सोबत शक्य नाही रडत थांबायच.
प्रत्येक हळव्या मनाला ह्या रोगाचा औषध मला पोहचवायच ......
मी प्रेमाला विचारल
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा