चुका
मी जेंव्हा स्वताशी बोलतो
तेंव्हा ओशाळलेल माझ मन
झालेल्या चुकांची कबुली देत
चूक कळत असताना सुद्धा
पुन्हा पुन्हा चूक होते
करा किंवा मरा ...
शेवटच्या पर्यायांची जागा मोकळी असते
प्रत्येक गोष्ट स्वानुभवातून शिकण्याचा हट्ट
आज ह्या टोकावर घेऊन आलेला असतो
जीवनदान पुन्हा मागायला लाजणार मन
कडेलोटाला पण भीत असत
काही चुका टाळता येतात
काही नजरे आड हि करता येतात
पण ज्या चुकांनी जीवनमार्ग खुंटतो
अश्या चुकांच्या मुळावर घाव घालावा लागतो ....
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा