रुसवा
जा मी नाही बोलत तुझ्याशी
लाजून ती म्हणाली मला
मी हसण्यावारी नेउन
आणखीन चिडवल तिला
नाक मुरडवून, पाठ वळवून
बराच वेळ बोट मोडत बसली,
मला वाटले थोड्या वेळात हसेल ती
पण प्रत्येक वेळी हवेवर उडणारी तिच्या केसांची बटच दिसली
नकट नाक तीच ढेमसा सारख फुगलेल
मग मी तिला बराच वेळ विनवलेल
काही बोलेना जशी दगडी मूर्ती ती
शेवटी फक्त पाया पडायचं उरलेल
नेहमी अस का होत
रुसलेल्या राणीला हसवायला राजालाच नाक घासाव लागत
तुम्ही आम्ही काही म्हणू हो
त्याच कारण त्या दोघांना चांगल ठाऊक असत
रुसवा तिचा एका अटीवर हटला
खुश करताना तिला खिसा माझा आटला
मी सुद्धा चूक तिची पटवून तिला मागे नेल
नकळत एक फुलपाखरू गालावरून उडून गेल ....
जा मी नाही बोलत तुझ्याशी
लाजून ती म्हणाली मला
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा