मामा
.
एका तपा नंतर दोघे भेटल्यावर,
एकमेकांना न्याहाळत, हसतच राहतात.
ती म्हणते तू होतास तसाच आहेस रे.
तीच मात्र एका फोटो फ्रेम मध्ये बसणंही आता अवघड आहे.
पूर्वी ती कोपऱ्यात बोलायाला देखील घाबरायाची.
अहो कसे दिवस बदलतात पाहणा,
आता मात्र मिठी मारायची ऊरलेली.
ती मला विचारते, कोठे होतास इतक्या दिवस.
मी हळंवा होऊन मनातच म्हणतो ....
तू सोडल्या वर पळत होतो स्वता पासुन रात्र न दिवस.
ती मला घरी यायच आमंत्रण देते.
त्यांना असलेल्या दांडग्या पगाराची नकळत कल्पना देते.
ती म्हणते माझं सांगण्यात तुझं विचारयाच विसरलं.
मी मनात म्हणतो तू गेल्यावर दिवस मोजायचाच सोडलेलं.
तेवढ्यात नकळत कुटुन तरी एक पिटुकल,
मम्मी मम्मी म्हणत समोर येत.
ती चटकन म्हणते, चिंटू हे तुझे मामा.
ते पिटुकल पटापट माझ्या गालाचे पापे घेत.
एका तपा नंतर दोघे भेटल्यावर ...................
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा