मी ... एक प्रश्न
माणसाच्या भाऊ गर्दीत मूक भावना मी 
आलेल्या भावना जागृत करणारा मी 
उतू गेलेल्या भावना गोळा करणारा मी 
हरवलेल्या भावना शोधणारा  मी 
भावनाट्य संस्कृतीतला मानव मी 
भावनाशुन्य माणसातला दानव मी 
पारदर्शक भावनाचा आरसा मी 
हळव्या भावनाचा आसरा मी 
विकृत धर्मभावना लादणारा मी 
पर धर्मभावना जपणारा मी 
भावनाविवश करून लुबाडणारा लबाड मी 
भावनान मध्ये गुरफटनारा हळवा मी 
स्वहितासाठी भावनाची कत्तल करणारा मी 
दुसऱ्यासाठी भावनाची कुर्बानी देणारा मी 
प्रेमभावना जपण्यासाठी प्रेम घेणारा मी 
भावनात्मक भूक शमवण्यासाठी प्रेम देणारा मी 
भावनाशुन्य माणसातला दानव मी 
भावनाप्रधान संस्कृतीतला मानव मी ......





1 टिप्पणी(ण्या):
दिलखेच..अगदी काळजा ला भेदनारा
टिप्पणी पोस्ट करा